विचारतोय गवा, ‘सुधारणार कवा?’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

राशिवडे बुद्रुक - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आणि वन्यजीव विभाग, बायसन नेचर क्‍लब, शासकीय विभाग व निसर्गप्रेमींच्या सहकार्यातून होणाऱ्या गतवर्षीप्रमाणे यंदाही २७ मे रोजी राधानगरी, दाजीपूर अभयारण्य स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. 

या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, गतवर्षी सहभागी झालेल्यांनीही  पुन्हा नाव नोंदणी करणे आवश्‍यक आहे. 

गेल्या वर्षी सकाळ माध्यम समूहातर्फे राधानगरी, दाजीपूर अभयारण्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. राधानगरी तालुक्‍यासह कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांतूनही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या मोहिमेत सुमारे ६० टन प्लास्टिक व बाटल्यांचा कचरा काढण्यात आला होता. यासाठी सुमारे दोन हजार हात झटले होते. ३० ठिकाणी एकाच वेळी मोहिमेला सुरवात झाली होती. अनेक संघटनांनी विविध रूपांनी मदतीचा हात दिला होता. ‘सकाळ’च्या या मोहिमेची राज्यासह केंद्र शासनानेही दखल घेतली गेली. त्याचबरोबर जागतिक पातळीवरही याची नोंद झाली. 

यंदाही लोकसहभागातून ही स्वच्छता मोहीम घेण्यात येत आहे. २७ मे रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत तीन तासच ही मोहीम होणार आहे. गतवर्षी सहभागी झालेल्या सर्व संघटना या वेळीही उत्स्फूर्तपर्ण सहभागी होणार आहेत. त्यासाठी अनेकांनी आतापासून सहकुटुंब सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू केली आहे.  

मोहिमेचे योग्य नियोजन करण्यासाठी समाजातील सहभागी होऊ इच्छिणारे तरुण मंडळे, महिला मंडळे, समाजसेवक, निसर्गमित्र, वनप्रेमी पर्यावरणवादी आदींनी नाव नोंदण्याची गरज आहे. या उपक्रमात राधानगरीतील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महसूल विभाग, पंचायत समिती, पोलिस खाते, वनखात्याचे सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे या वेळीही व्यापक स्वरूपात ही मोहीम घेण्यासाठी नियोजन केले गेले आहे.  

स्वाभिामानीचे कार्यकर्ते आत्मक्‍लेशमध्ये आणि अभियानातही
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-मुंबई आत्मक्‍लेश यात्रा २२ ते ३० मे दरम्यान निघणार आहे. यात जाणाऱ्या कार्यकर्त्यांशिवाय उर्वरित कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिल्ले लावून पाण्याचे स्रोत आणि जंगल वाचविण्यासाठी ‘सकाळ’च्या मोहिमेत सहभागी होतील, असे संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष अजित पोवार यांनी सांगितले. दरम्यान, परितेच्या संकल्प फौंडेशनचे तानाजी पाटील व त्यांचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

Web Title: Dazipur Sanctuary Sanitation Campaign