आइस्क्रीम मागण्यावरून कोल्हापुरात प्राणघातक हल्ला; दोघे जखमी

Deadly  Attack In Kolhapur On Demand Of Ice Cream
Deadly Attack In Kolhapur On Demand Of Ice Cream

कोल्हापूर - आइस्क्रीम मागण्यावरून हत्याराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. अजय विलास पाटील (वय ३२) आणि स्वप्नील चंद्रकांत पाटील (३०, दोघे रा. अंबाई टॅंक परिसर) अशी जखमींची नावे आहेत. गजबजलेल्या शालिनी पॅलेस परिसरात सायंकाळी हा प्रकार घडला. तसा परिसरात तणाव निर्माण झाला. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. दोघा अज्ञात हल्लेखोरांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अंबाई टॅंक परिसरात राहणारे अजय व स्वप्नील पाटील हे आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबाई टॅंक परिसरात गेले. त्या दोघांनी विक्रेत्याकडे आइस्क्रीम मागितले; मात्र त्याने मालक आल्यानंतर घ्या, असे त्यांना सांगितले. याचा राग आल्याने त्या दोघांनी त्याची गाडी बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.

डोक्‍याला तोंडाला गंभीर दुखापत

दरम्यान, तेथे दोघे जण आल्यावर त्यांनी याचा जाब त्या दोघांना विचारला. यानंतर त्यांनी या दोघांवर हत्याराने हल्ला केला. यात त्यांच्या डोक्‍याला तोंडाला गंभीर दुखापत झाली. भर रस्त्यावर हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांची धावाधाव व आरडाओरडा सुरू झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. 

संबंधित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले, पण त्यांना हल्लेखोर पसार झाल्याचे आणि जखमीही निघून गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी जखमींचा शोध रुग्णालयातून सुरू केला. दरम्यान, आठच्या सुमारास जखमी अजय व स्वप्नील हे सीपीआरमध्ये स्वतः दाखल झाले. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर घुले यांनी त्यांचे जबाब नोंदवले. यानंतर संबंधित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते. एक वयस्क आणि एक तरुण असे दोन हल्लेखोर असल्याचे जखमी पोलिसांना सांगत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com