साताऱ्यात अपघाता शहा यांचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सातारा : ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे झालेल्या वाहतूक बदलामुळे अनेकजण विरुद्ध दिशेने वाहने घालतात. यामुळे अपघात होत असून, यामध्ये एकाचा मृत्यु झाला. राजन चंपालाल शहा (वय 50, रा. प्रतापगंज पेठ) असे मृत व्यावसाईकाचे नाव आहे. त्यांचे पोवईनाक्‍यावर सनी मेडिकल नावाचे दुकान आहे. 

सातारा : ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे झालेल्या वाहतूक बदलामुळे अनेकजण विरुद्ध दिशेने वाहने घालतात. यामुळे अपघात होत असून, यामध्ये एकाचा मृत्यु झाला. राजन चंपालाल शहा (वय 50, रा. प्रतापगंज पेठ) असे मृत व्यावसाईकाचे नाव आहे. त्यांचे पोवईनाक्‍यावर सनी मेडिकल नावाचे दुकान आहे. 

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये राजपथावरुन पोवई नाक्‍यावर येण्यासाठी एकरी वाहतूक करण्यात आली आहे. तसेच पोवई नाक्‍यावरून राजवाड्याकडे जाण्यासाठी मोनार्क हॉटेल मार्गे वाहतूक करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, रात्रीच्या वेळी या नियमांचे पालन होत नाही. ते होते की नाही हे पाहण्यासाठीही कोणतीच यंत्रणा काम करत नाही. त्यामुळे ऐकरी रस्त्यावरून काही वेळा दुहेरी वाहतूक होत असते. त्याचाच फटका राजन शहा यांना बसला. काल रात्री मेडीकल बंद केल्यानंतर ते शाहुकला मंदीरामध्ये असलेल्या पंचम संस्थेच्या गायनाच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमातील संगिताचा आनंद घेतल्यानंतर ते एसटी कॉलनीतील त्यांच्या घरी निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने घाला घातला. पोवई नाक्‍यावरून नो एन्ट्री असतानाही भरधाव वेगाने आलेल्या वाहन चालकांने त्यांच्या गाडीला धडक दिली. या वेळी डोक्‍यावर पडल्याने शहा गंभिर जखमी झाले. रात्रीची वेळ व पाऊस असल्याने वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे ते बराच काळ अपघातस्थळी पडून होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्या वडीलांचे साताऱ्यातील सामाजिक व शैक्षणीक क्षेत्रात चांगले योगदान आहे. त्याचबरोबर चांगल्या स्वभावामुळे राजनही साताऱ्यात सुपरिचीत होते. त्यांच्या मृत्यूमुळे शहरातील सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Death of accident Shah in Satara