मटणाच्या रस्स्यात पडून बालिकेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

सांगली जिल्ह्यातील संख (ता. जत) येथील साक्षी योगेश कांबळे (वय 4) ही मुलगी मटणाच्या रस्याच्या पातेल्यामध्ये पडून गंभीर भाजली. मिरज येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना तिचा काल मृत्यू झाला.
 

माडग्याळ : सांगली जिल्ह्यातील संख (ता. जत) येथील साक्षी योगेश कांबळे (वय 4) ही मुलगी मटणाच्या रस्याच्या पातेल्यामध्ये पडून गंभीर भाजली. मिरज येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना तिचा काल मृत्यू झाला.

ही घटना सोमवार दुपारी घडली होती. उमदी पोलिसात याची नोंद नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. योगेश कांबळे यांच्या घरी कार्यक्रम होता. त्यासाठी मटणाचा बेत केला होता. पाऊस आल्यानंतर रस्याचे पातेल घरात ठेवले. लहान साक्षी खेळत पातेल्याजवळ गेली. गरम रस्यात पडल्याने ती गंभीर भाजली. उपचारादरम्यान शुक्रवारी तीचा मृत्यू झाला.

Web Title: The death of the baby due to Burns