कोल्हापूरात डेंगीने फुटबॉलपटूचा; तर स्वाईन फ्लूने डॉक्‍टरचा मृत्यू

कोल्हापूरात डेंगीने फुटबॉलपटूचा; तर स्वाईन फ्लूने डॉक्‍टरचा मृत्यू

कोल्हापूर - येथे देवणे गल्लीतील फुटबॉलपटू रोहन सुरेश जाधव (वय २६) याचा डेंगीसदृश आजाराने आज मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर परिसरात ठाण मांडलेल्या स्वाईन फ्लूने मंगळवार पेठेत कोष्टी गल्लीतील डॉ. शंकर विरूपाक्ष करपे (वय ७२) यांचा बळी घेतला. त्यामुळे मंगळवार पेठेवर शोककळा पसरली.   

मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाचा उमदा खेळाडू रोहनवर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. तो गोखले कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याला एक बहीण आहे. त्याच्या घरचा केटरर्सचा व्यवसाय आहे. परिस्थिती बेताची असताना त्याने शिक्षण व खेळात जिद्दीने प्रगती केली होती. तो पीटीएम ‘ब’ संघाकडून खेळत होता. नियमित फुटबॉलचा सराव, व्यायामामुळे तो तंदुरुस्त होता. गतवर्षीच्या फुटबॉल हंगामातील विविध सामन्यांत त्याने चमकदार कामगिरी बजावली होती. काही दिवसांपूर्वी त्याला तापाचे निमित्त झाले. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाही त्याच्या प्रकृतीत चढ-उतार होत होता. त्याच्या निधनाची माहिती मिळताच देवणे गल्लीतील घरासमोर फुटबॉल खेळाडूंची मोठी गर्दी झाली. त्याच्या मित्रासह खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते.  

दरम्यान, जिल्ह्यात आजअखेर ३४ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूने सध्या गंभीर रूप धारण केले. सलग तीन दिवसांत तिघांचा मृत्यू होण्याच्या दोन घटना गेल्या दहा दिवसांत घडल्या. दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात गेल्या चार दिवसांत काही अंशी घट झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध रुग्णालयांत सहा रुग्ण शहरातील, तिघे ग्रामीण भागातील तर सहा परजिल्ह्यांतील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com