पाचगणीत पॅराग्लायडिंग करताना परदेशी पर्यटकाचा मृत्यू

paragliding.
paragliding.

वाई - पाचगणी येथून पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातात मंगळवारी (ता.१२) एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. 

पॅराग्लायडिंगचा सराव करीत असताना पाचगणी येथून उड्डाण केल्यानंतर डोंगराला धडकून अभेपुरी गावच्या हद्दीत पडल्याने कोरियन नागरिक सांग टेक ओह (वय ४५ वर्षे) हा गंभीर जखमी झाले. त्यांना रात्री ८ वाजता उपचारासाठी वाई मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई येथून ते पाच दिवसांच्या टूरवर पाचगणी येथे आले होता.

ही माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे व पोलिस कर्मचारी हजर होते. अधिक तपास सहायक निरीक्षक बी. बी. येडगे करत आहेत. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. कोरियन दूतावसाचे अधिकारी वाईत आले. आज सकाळी शवविच्छेदन करून कोरियन दूतावासचे अधिकारी व नातेवाईक यांच्या सूचनेनुसार परदेशी सोपस्कर पूर्ण करून मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर वाईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com