पाटणमध्ये 300 फुट खाली नाल्यात पडुन गव्याचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील कोयना विभागातील कामरगावच्या हद्दीत डोंगरावरुन 300 फुट खाली नाल्यात पडुन गव्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. वन्यजीव विभागाने घटना स्थळाला भेट देऊन पंचनामा केला असुन उद्या गव्यास क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येणार आहे.
 

पाटण (सातारा)- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील कोयना विभागातील कामरगावच्या हद्दीत डोंगरावरुन 300 फुट खाली नाल्यात पडुन गव्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. वन्यजीव विभागाने घटना स्थळाला भेट देऊन पंचनामा केला असुन उद्या गव्यास क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येणार आहे.

याबाबत, वन्यजीव विभागाकडुन मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास कामरगावच्या हद्दीत जोंगरमाथ्यावर असणारा गवा डोंगरावरुन तीनशेफुट खाली गाढवराई धबधब्याच्या नाल्यात पडला. 300 फुट उंचावरुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. ही माहिती वन्यजीव विभागाच्या कोयनानगर येथील कार्यालयात समजताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ते पोहचण्यापुर्वीच गव्याचा मृत्यु झाला होता.

घटनेची माहिती समजल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला आहे. गवा पडलेले ठिकाण अडचणीचे असल्याने उद्या क्रेन आणण्यात येणार आहे.  मृत झालेल्या गव्यास क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती सुरेश साळुंखे, सहाय्यक वन संरक्षक, वन्यजीव कोयना यांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली.

Web Title: The death gaur animal due to 300 feet down the drain in Patan