गव्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

शेल धाडा - गोवा,गुळेली,सत्तरी येथील शेल धाडा या गावात आज सकाळी गव्यारेड्याने दुचाकीस्वारांवर केलेल्या हल्ल्यात मागे बसलेल्या 22 वर्षीय पुजन मेळेकर या तरुणीचा मृत्यू झाला. दुचाकी चालक तिचा भाऊ गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. या परिसरात यापूर्वीही गव्याने एका महिलेवर हल्ल्या केला होता त्यामध्ये तिचा मृत्यू झाला होता. आजची ही दुसरी घटना. 

सकाळी साडेसातच्या सुमारास पूजन ही आपल्या भावाबरोबर दुचाकीवरून बसून कामाला जात होती. त्यावेळी अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. भयभीत झालेल्या तिच्या भावाचे दुचाकीवरील नियंत्रण गेले व दोघेही पडले. यावेळी मागून येणाऱ्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी दोघांना इस्पितळात दाखल केले मात्र त्यापूर्वीच पूजन हिचा मृत्यू झाला होता. 

याप्रकरणाची स्थानिक आमदार व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वन खात्याच्या निष्काळजणीपणामुळे हा दुसरा बळी गेला असा संताप व्यक्त केला. वन अधिकाऱ्यांना अशा गवारेड्यांना ट्रँक्विलायजरचा वापर करून पकडण्याचे आदेश दिले आहे. सत्तरी गावात या गवारेड्यांचे वास्तव्य वाढल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी भेट घेण्याचे ठरविले आहे.

Web Title: The death of the girl in the attack of Gaur