इस्लामपूर रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला पुन्हा एकाचा बळी

uday gayakwad.jpg
uday gayakwad.jpg

आष्टा (सांगली)-  आष्टा- इस्लामपूर रस्त्यावरील खड्ड्यांनी आज पुन्हा एकाचा बळी घेतला. रस्त्यावरील खड्ड्यात मोटारसायकल गेल्याने डांबरीवरती पडून उदय बाळासो गायकवाड (वय 40, रा. अंकलखोप, ता. पलूस) यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

पोलिसांनी सांगितले, "उदय गायकवाड हे मोटारसायकल (एमएच 01, बीएफ 9099) वरून इस्लामपूरकडून आष्ट्याकडे येत होते. आष्टा लायनर्स समोरील रस्त्यावरील खड्ड्यांत गाडी गेल्याने तोल जाऊन ते डांबरीवरती आपटले. डोक्‍याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले. नातेवाईक दत्ता चौगुले यांनी त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती डॉ. मधुकर जाधव यांनी आष्टा पोलिसांना दिली.

आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर महिन्याभरात खड्ड्यांमुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार नागरिकांनी मागणी करून देखील संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहात आहे, अशी संतप्त भावना प्रवासी आणि नागरिकांतून व्यक्त होत आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com