
Belgaum News : जुळ्याना जन्म दिल्यानंतर अर्भकासह मातेचा मृत्यू
बेळगाव : जुळ्याना जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने पुरुष जातीच्या अर्भकासह मातेचा मृत्यू झाला. रशीना मगदूमसाब जहांगीरदार (वय २५, रा. सुळेभावी ता.बेळगाव) असे तिचे नाव आहे. रविवार (ता.२६) जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली असून घटनेची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
रशीना यांचे लग्न होऊन तीन वर्षे उलटली असून त्या गर्भवती राहिल्याने प्रसूतीसाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ तारखेला त्यांनी पुरुष आणि स्त्रीलिंग जातीच्या जुळ्या अर्भकाना जन्म दिला. त्यावेळी पुरूष जातीच्या अर्भकाचा मृत्यू झाला.
तर स्त्री जातीच्या अर्भकाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. रशीना याना कावीळ होती. तसेच त्यांना अतिरक्तत्राव देखील सुरू होता. अधिक उपचारासाठी त्याना पुन्हा बेळगाव जिल्हा रुग्णालयात शनिवार (ता.२५) हलविण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.