धोम धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
वाई - मोरजीवाडा-चिखली (ता. वाई) येथे ओमकार ज्ञानेश्वर वाडकर या पंधरा वर्षीय मुलाचा धोम जलायशयात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी बोटी व जाळीच्या साह्याने जलाशयात त्याचा शोध घेतला. तब्बल सोळा तासांनंतर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात यश आले. ओमकार काल दुपारी चारच्या सुमारास दोन मित्रांसमवेत बैल धुण्यासाठी धोम जलाशयावर गेला होता. पाय घसरून तो जलशयात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडाला. ग्रामस्थांनी व महाबळेश्वर ट्रेकर्सनी रात्रभर शोध घेतला.
वाई - मोरजीवाडा-चिखली (ता. वाई) येथे ओमकार ज्ञानेश्वर वाडकर या पंधरा वर्षीय मुलाचा धोम जलायशयात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी बोटी व जाळीच्या साह्याने जलाशयात त्याचा शोध घेतला. तब्बल सोळा तासांनंतर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात यश आले. ओमकार काल दुपारी चारच्या सुमारास दोन मित्रांसमवेत बैल धुण्यासाठी धोम जलाशयावर गेला होता. पाय घसरून तो जलशयात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडाला. ग्रामस्थांनी व महाबळेश्वर ट्रेकर्सनी रात्रभर शोध घेतला. आज सकाळी साडेनऊ वाजता त्याचा मृतदेह आढळला. ओमकार नुकताच दहावीत गेला होता. कुटुंबातील एकुलता मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.