वीजेचा धक्का बसून विद्यार्थ्याचा मृत्यू 

student.jpg
student.jpg

सोलापूर : न्यू बुधवार पेठ परिसरात राहणाऱ्या तरुणाचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. ही घटना पाणी उशीरा आल्यानंतर इलेक्‍ट्रिक मोटार नळाला लावत असताना विजेचा धक्का बसून झाल्याची माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली. 

अभिषेक दीपक शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दयानंद महाविद्यालयात अकरावीला शिकायला आहे. त्याचे वडील महानगरपालिकेत कर संकलन विभागात वाहन चालक आहेत. न्यू बुधवार पेठ परिसरात कस्तुरबा पाण्याची टाकीवरून पाणी पुरवठा होतो. सततच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे सकाळी सहा वाजता येणारे पाणी शनिवारी दुपारी दीड वाजता आले. कॉलेजवरून घरी आल्यानंतर पाणी भरण्याच्या घाईत अभिषेक नळाला विजेची मोटार लावत होता. परंतु काळाने घात केला. विजेचा धक्का बसून तो उडून खाली पडला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, कॉंग्रेस गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अशोक जानराव आदी आले होते. 
शनिवारी रात्री उशिरा अभिषेकवर अत्यंसंस्कार करण्यात आले. 

''सततच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे निष्पाप मुलाचा बळी गेला आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.''
- आनंद चंदनशिवे, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com