विजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत अनिल चव्हाण मूळचे जलना येथील आहेत. ऊस तोडीसाठी ते आज कर्नाळ येथे आले होते.

ट्रॅक्‍टरीची ट्रॅली ऊसाने भरल्यानंतर ते त्यावर बसले होते. त्यावेळी विद्युत वाहिनी तुटली आणि अनिल यांना विजेचा जोराचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूबाबात ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.

Web Title: The death of sugarcane cutter labor by electric shock