ट्रॅक्टर वरून पडून ऊस तोडी मजुराचा मृत्यु

चंद्रकांत देवकते
सोमवार, 19 मार्च 2018

ट्रॅक्टर वरून पडून ऊस तोडी मजुराचा मृत्यु झाल्याची घटना घडली.

मोहोळ (जि. सोलापूर) - मोहोळहून आठवड्याचा बाजार करून जात असताना रविवार रात्री ९. वाजता ट्रॅक्टर वरून पडून ऊस तोडी मजुराचा मृत्यु झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्यावर ऊस तोडीसाठी आलेले मजुर रविवारी आठवड्याच्या बाजारासाठी मोहोळला आले होते. बाजार घेऊन बायका पोरासह हे मजुर परत आपल्या टोळीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना पासलेवाडीच्या आसपास रात्री ९ च्या सुमारास ऊस तोड मजुर उत्तम ज्ञानोबा इंगळे वय ३५ रा. वागबेट परळी वैजीनाथ जि. बीड हा टॅक्टर वरुन खाली पडला. व त्यांच्या अंगावरून टॅक्टरचे चाक गेल्याने उत्तम कांबळे याचा अपघाती मृत्यु झाला. अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत .

Web Title: The death of sugarcane laborer falling from the tractor