लसीकरणानंतर तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू

लसीकरणानंतर तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू

पंढरपूर : आरोग्य विभागाच्या वतीने लहान मुलांना देण्यात आलेल्या लसीकरणानंतर साडेतीन महिने वयाच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे आज घडली. विराज  दत्तात्रय अटकळे असे या मृत बालकाचे नाव आहे.

मंगळवारी (ता.20) आरोग्य विभागाच्या कर्मचारर्यांनी कौठाळी गावातील विराज अटकळेसह 15 ते 20 लहान बालकांना पेंटा व्हायलंट नावाची लस देण्यात आली होती. संध्याकाळ पर्यंत विराज खेळत होता.रात्री झोपी गेला. आज सकाळी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृत झाल्याचे दिसून आले. या घटने नंतर आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या घटने नंतर गादेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकरी अनिष तांबोळी घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. वैद्यकीय तपासणी नंतरच बाळाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला आहे  हे स्पष्ट होणार आहे.

तालुका वैद्यकीय अधिकार्यांची पाठ
तालुका  वैदयकीय अधिकिरी डाॅ. एकनाथ बोधले यांना येथील पालकांनी या घटनेची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी उशीरा पर्यंत घटना स्थळी आले नव्हते. त्यांच्या बेफिकीरी बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पालक दत्तात्रय अटकळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com