केडगावमधील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

nagar
nagar

नगर - नगर-पुणे महामार्गावर केडगावात गुरुवारी पहाटे व सकाळी दोन अपघात घडले. त्यामध्ये युवक व युवतीला अवजड वाहनांनी चिरडले. विठ्ठल अनभुले, अनामिक गायकवाड अशी दोन मृतांची नावे आहेत.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करत वाहतूक रोखली होती. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रदीर्घ काळ विस्कळीत झाली. नगर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा ठरला आहे. हाच मुद्दा आंदोलकांच्या टीकेचा ठरला.

केडगाव मधील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज पुन्हा बळी गेले, अशी संतप्त भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. गावातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू केल्यामुळे या आधीही अनेक वेळा अपघात झाले आहेत. अनेक वेळा आंदोलने होऊन देखील याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक संतापले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com