कोरेगावच्या व्यापाऱ्याचा दरीत दुचाकीसह पडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

भिलार - पाचगणी- वाई दरम्यान असलेल्या दांडेघरजवळील हॅरिसन फॉल या पर्यटनस्थळावरून दरीत मोटारसायकल कोसळून झालेल्या अपघातात कोरेगाव येथील व्यापारी विघ्नेश सुबराव शानभाग (वय 51) यांचा मृत्यू झाला. आज सकाळी अपघातग्रस्त गाडी व मृतदेह वर काढण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, हा अपघात, आत्महत्या, की घातपात आहे, याबाबत पोलिसांना संशय असून, त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे. 

पाचगणी पोलिस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की दांडेघरचे सरपंच शंकर गणपत कळंबे यांनी काल दुपारी एक मोटारसायकल दरीत कोसळल्याची माहिती पोलिसांना दिली. रात्री उशिरा महाबळेश्‍वरच्या सह्याद्री टेकर्सच्या सहकार्याने पाचगणी पोलिस व नागरिकांनी शोधकार्यास सुरवात केली. मात्र, रात्री अंधार झाल्यानंतर हे काम थांबवले गेले. आज सकाळी अपघातग्रस्त गाडी व मृतदेह वर काढण्यात पोलिसांना यश आले. विघ्नेश हे सुभाषनगर (कोरेगाव) येथील व्यापारी आहेत. ते होंडा शाइन या मोटारसायकवरून (एमएच 11 एई 6725) कोरेगावहून आले होते. शानभाग यांचे कोरेगावात मद्यविक्रीचे दुकान व एक लॉज असल्याचे समजते. 

मदतकार्यात पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह सह्याद्री ट्रेकर्सचे कार्यकर्ते व पाचगणीचे अजय बोरा, सूर्यकांत कासुर्डे, शेखर कासुर्डे, सहायक फौजदार लक्ष्मण येवले, मारुती इथापे, मुबारक सय्यद, वैभव भिलारे, अभिजित मंडले, तुषार जगताप, प्रशांत पवार, अभिजित घनवट, प्रकाश जगताप यांनी भाग घेतला. शानभाग यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 

हा अपघात मुख्य रस्त्यावर झाला नसून, हॅरिसन फॉली या रस्त्याच्या आत असणाऱ्या पर्यटनस्थळावरून झाला आहे. त्यामुळे हा अपघात, घातपात, की आत्महत्या आहे, याबाबत अधिक तपास पाचगणी पोलिस करीत आहेत. 

Web Title: Death in a valley with a bike