देसवडे येथे उष्माघाताने महिलेचा मृत्यू

The death of a woman because heat stroke at Deswade
The death of a woman because heat stroke at Deswade

टाकळी ढोकेश्वर : देसवडे (ता. पारनेर) येथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. 28) ला दुपारी चार वाजता घडली. संगिता गेणभाऊ फटांगरे (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत माहीती अशी की, संगीता फंटागरे या रविवारी रखरखत्या उन्हात शेतात जनावरांसाठी चारा काढत असताना दुपारी 4 वाजता त्यांना अचानक ताप आल्यामुळे चक्कर व अस्वस्थ वाटू लागले. संध्याकाळी साकुर येथे रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी संगमनेर येथे हलविण्यास सांगितले. संगमनेर येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता शरीरातील ताप हा 110 वर होता. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही महिलेला वाचवू शकले नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर सूर्य आग ओकत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ताप, खोकला, घशाचे आजार वाढले आहेत. जास्त काळ उन्हात काम करणाऱ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे.पारनेर तालुक्यातील तापमान 45.9 अंशावर पोहचल्याने उष्णतेची लाट आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com