विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

शेरे येथे सयाजी निकम यांच्या घराचे काम सुरु होते. त्यासाठी घराच्या खिडकीतून विजेची वायर कामासाठी शेजारी नेण्यात आली होती. याच खिडकीला रुपाली निकम यांचा हात लागल्याने त्यांना विजेचा मोठा धक्का बसला.

कऱ्हाड : राहत्या घरी विजेचा शाॅक लागून एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास शेरे (ता.कऱ्हाड) येथे घडली. त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. रुपाली सयाजी निकम (वय 30 रा. शेरे) असे संबंधित मृत्यु झालेल्या महिलेचे नाव असल्याची माहिती कराड तालुका पोलिसांनी दिली. 

शेरे येथे सयाजी निकम यांच्या घराचे काम सुरु होते. त्यासाठी घराच्या खिडकीतून विजेची वायर कामासाठी शेजारी नेण्यात आली होती. याच खिडकीला रुपाली निकम यांचा हात लागल्याने त्यांना विजेचा मोठा धक्का बसला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने त्यांना उपाचारासाठी येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले. दरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी तालुका पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक अशोकराव भापकर यांनी भेट दिली.

Web Title: Death of woman due to electric shock