शासकीय रुग्णालयात प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

प्रसूती दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. तर बाळाची प्रकृती गंभीर बनली. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होवून रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला.

सांगली - वसंतदादा शासकीय रुग्णालयात काल (गुरुवारी) रात्री प्रसूती दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. तर बाळाची प्रकृती गंभीर बनली. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होवून रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली. यावेळी रुग्णालयात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

याबाबत अधिक माहिती अशी, संजयनगर येथील रेहाना उस्माणगणी मुतवल्ली (वय 23, रा. संजयनगर, बेघर वसाहत) या महिलेस प्रसूतीसाठी बुधवारी (ता. 4) रोजी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिला पहिला अडीच वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती फरशी फिटींगचे काम करतो. पहिली प्रसूती सिझर केली होती. त्यामुळे दुसऱ्या प्रसूतीवेळीही सिझर करा अशी नातेवाईकांची मागणी होती. काल (गुरुवारी) रात्री महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्यावर सिझर करा अशी मागणी नातेवाईकांनी केली. मात्र सामान्य प्रसूती करण्याचा डॉक्‍टरांचा प्रयत्न होता. महिलेची प्रसूती झाली. मात्र तिला मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव होवू लागला आणि तिची प्रकृती गंभीर बनली. तिला वाचवण्याचा प्रयत्न डॉक्‍टरांनी केला. मात्र ती पहाटे मयत झाली. तर बाळाची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला काचेच्या पेटीत ठेवून उपचार सुरु करण्यात आले. 

महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच महिलेच्या सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. संतप्त होवून त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी तातडीने पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण पोलिसांसह रुग्णालयात आले. उपअधीक्षक अशोक वीरकर यांनीही रुग्णालयात भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा विनया पाठक, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनीही रुग्णालयात भट देवून चर्चा केली. 
दरम्यान,

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Death of a woman during delivery at government hospital