डेक्कन ओडीसीतील पर्यटकांनी अनुभवली कोल्हापुरी संस्कृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - महाराष्ट्र पर्यटन विकासाचा भाग म्हणून सुरू झालेल्या डेक्कन ओडीसी या आलिशान रेल्वेची यंदाच्या हंगामात दुसरी फेरी येथे झाली. यातून ६८ विदेशी पर्यटकांनी कोल्हापूरच्या विविध सौंदर्य छटा अनुभवल्या. यात जुना राजवाडा परिसरात झालेल्या मर्दानी खेळ व हलगी वादनाने पर्यटक थक्क झाले. 

‘पॅलेस ऑन व्हील’च्या धर्तीवर देशातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर घडविण्यासाठी डेक्कन ओडीसी रेल्वे चालविली जाते. यात बहुतांशी विदेशी पर्यटक लाभ घेतात. आरामदायी आसन व्यवस्थेपासून विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण सुविधा असलेल्या या रेल्वेचा प्रवास सुरू झाला. मुंबईतून पुणेमार्गे रेल्वे कोल्हापुरात आली. यात एकूण ६८ पर्यटक होते. यात बहुतांशी युरोप, जर्मनी व फ्रान्समधील होते. यानंतर खासगी बसमधून पर्यटकांना अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, दूध कट्टा, कोल्हापुरी चप्पल आदींची माहिती दिली. तसेच न्यू पॅलेस येथे सैर घडविण्यात आली. यात कोल्हापूरचा इतिहास, मंदिर, स्थापत्य कला, मूर्तिकला आदींची माहिती देण्यात आली. 

जुना राजवाडा येथे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके झाली. यातील तलवारीने लिंबू कापण्याबरोबर वेगवान पद्धतीने लाठीकाठी फिरविण्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांना पर्यटकांनी दाद दिली. हॉटेल पॅव्हेलियन येथे ‘लावण्यसंध्या’ हा लोकसंगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ढोलकी, टाळ, संवादिनी अशा विविध वाद्य वादनाचा विदेशी पर्यटकांनी अनुभव घेतला. 

Web Title: Deccan Odisi Tourist visit Kolhapur

टॅग्स