
केंद्र, राज्य सरकार, जिल्हाधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी कोविड १९ च्या पार्श्नभूमीवर यात्रा रद्दचे आदेश दिले आहेत.
झरे - मानेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री जकाईदेवीची त्रैवार्षिक यात्रा पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच अमोल खरात यांनी दिली.
केंद्र, राज्य सरकार, जिल्हाधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी कोविड १९ च्या पार्श्नभूमीवर यात्रा रद्दचे आदेश दिले आहेत. भाविकांनी मंदिराकडे जाऊ नये. गर्दी करू नये. आदेशाचा भंग केला तर कारवाईचे आदेश आहेत.
भाविकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन ग्रामस्थ व पोलिसांच्या बैठकीनंतर सरपंच अमोल खरात यांनी केले.
श्री जकाई देवी यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. राज्यातूनच नव्हे तर राज्याबाहेरून भाविक येतात. तीन वर्षातून एकदा यात्रा भरते. व्यावसायिक, गलाई व्यावसायिक आवर्जून येतात. यात्रा रद्दमुळे भाविकांचा हिरमोड झाला आहे.
हे पण वाचा - जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी केलं मोठं वक्तव्य
तीन वर्षांतून एकदा यात्रा असल्याने गावकऱ्यांनी स्वच्छता, रंगरंगोटी, सुशोभिकरण अशी कामे केली आहेत. ग्रामपंचायतीने सहकार्य केले. परंतु शासन आदेशामुळे यात्रा रद्द करावी लागली. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मानेवाडी येथे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक सुधीर पाटील, प्रकाश कांबळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी बैठकीत केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
सरपंच श्री. खरात, सदाशिव मेटकरी, महादेव देवकाते, घनश्याम मेटकरी, विनोद खरात, मोहन जाधव, शहाजी माने, सुनील खरात, वसंत मेटकरी, गजानन मेटकरी, गणेश देवकाते, आप्पासो माने, कुंडलिक माने, हनमंत मेटकरी, अमर मेटकरी, ग्रामसेवक श्रीकंदार पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे