मोहोळ: प्रशासनाकडून शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे, खते वितरणाचा निर्णय

Decision to distribute fodder seeds fertilizers on one hundred percent subsidy from the administration
Decision to distribute fodder seeds fertilizers on one hundred percent subsidy from the administration

मोहोळ - मोहोळ तालुक्यातील पशुधन जगविण्यासाठी व दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, राष्ट्रीय वैरण विकास योजनेअंतर्गत पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकुण पंचवीस कोटीचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. दरम्यान अशा प्रकारची नियोजन बैठक जिल्हयात मोहोळ येथे पहिल्यांदाच संपन्न  झाली आहे.

तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या उपाय योजनेसाठी बैठकीचे आयोजन तहसीलदार बनसोडे यांनी केले होते. तालुक्यात चालु पावसाळ्यात केवळ चाळीस टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध पशुधन सुस्थितीत व आरोग्यसंपन्न रहावे यासाठी वैरण विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी अर्ज भरून देण्याची मुदत वाढविली आहे. तालुक्यात लहान, मोठी  व शेळ्या मेंढया मिळुन एकुण  एक लाख आठ हजार तीनशे चाळीस जनावरे आहेत. त्यांना अठ्ठाविस दिवस पुरेल एवढा वाळला व नव्वद दिवस पुरेल एवढा ओला चारा उपलब्ध आहे.

तालुक्यात एकुण चौपन्न हजार सहाशे पाच जॉबकार्ड धारक असुन त्यांना जुन महीन्यापर्यंत पुरेल एवढ्या कामाचे नियोजन सुरू आहे. प्रत्येक गावात किमान पाच पाणंद रस्ते कामाचेही नियोजन आहे. पाणी टंचाई आराखडयात एकुण पस्तीस गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची पाण्यासाठी टँकरची मागणी येताच त्यांना तात्काळ टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुक्यात एकूण सहा हजार ऐंशी हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

चार सदस्यीय समिती गठीत -
तालुक्यातील दुष्काळ निवारण्यासाठी व उपाय योजनेसाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे, ती पुढीलप्रमाणे...

तहसीलदार जीवन बनसोडे (अध्यक्ष), गटविकास अधिकारी अजिंक्य येळे (सह अध्यक्ष), तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी (सदस्य), पशुधन विकास अधिकारी डॉ. ओ. व्ही. सोनाळे (सदस्य सचिव).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com