फेअरडीलला सव्वा कोटी देण्याचा निर्णय अमान्य 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

कोल्हापूर - फेअरडील कंपनीला 125 कोटी देण्यासंदर्भात लवादाने दिलेला निर्णय मान्य नसल्याची भूमिका आज पालिकेने नगरविकास राज्यमंत्र्याकडे झालेल्या सुनावणीवेळी मांडली. शहरातील जकात वसुलीचा ठेका फेअरडीलकडे होता. ठेका काढून घेतल्यानंतर भरपाईवरुन झालेला वाद लवादापर्यत गेला होता. लवादाने निर्णय दिल्यानंतर आता पुन्हा नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी याबाबत सुनावणी घेतली आहे. 

फेअडरडील कंपनीविषयीच्या तक्रारीनंतर ठेका कंपनीने अटी आणि शर्तीचा भंग केल्यामुळे रद्द केला होता. नुकसान भरपाईसाठी कंपनीने विविध मार्गाने प्रयत्न केले. त्यानंतर लवादाची नियुक्ती केली. लवादाने महापालिकेने फेअरडील कंपनीचे पैसे अठरा टक्के व्याजासह परत द्यावेत, असा आदेश दिला आहे. ही रक्कम 125 कोटी रुपयापर्यंत जाते; पण लवादाचा हा निर्णय महापालिकेला मान्य नसल्याने महापालिका याविरोधात उच्च न्यायालयात अपिल करणार आहे. 

दरम्यान नगरविकास राज्यमंत्री योगश सागर यांनी आज मुंबई मंत्रालयात याप्रकरणी सुनावणी आयोजित केली होती.या सुनावणीत महापालिकेने रक्कम अमान्य केली असून याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापलिकेच्यावतीने आयुक्त डॉ. कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर सुनावणीला उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision to give 1.25 cores rupees to Fairdeal is invalid