मराठा आरक्षणावर शुक्रवारी निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

सोलापूर - मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक अन्नतीसाठी आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा सर्वपक्षीय तातडीचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत दाखल झाला आहे. त्यावर शुक्रवारी (ता.11) होणाऱ्या सभेत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोलापुरात 21 सप्टेंबर 2016 ला महामोर्चा काढण्यात आला होता. त्याला अनुसरून हा प्रस्ताव देण्यात आला आहे. कॉंग्रेसचे चेतन नरोटे, विनोद भोसले, प्रिया माने, भाजपचे संतोष भोसले, सुरेखा काकडे, विक्रांत वानकर, शिवसेनेचे अमोल शिंदे, मंदाकिनी पवार, वत्सला बरगंडे, गणेश वानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव, एमआयएमच्या नूतन गायकवाड आणि बहुजन समाज पक्षाचे आनंद चंदनशिवे यांनी हा प्रस्ताव दिला आहे. 

समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आरक्षण देणे महत्त्वाचे आहे. आरक्षण मिळाल्यास या समाजबांधवांना प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. त्यामुळे मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यवाही करावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यावर शुक्रवारी होणाऱ्या सभेत निर्णय होईल. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Decision on Maratha reservation at friday