आमदार प्रणिती शिंदे यांच्या जामीनावर उद्या निर्णय 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे व नगरसेवक चेतन नरोटे यांच्या जामीनावर बुधवारी (ता. 11) निर्णय होणार आहे. 

आमदार प्रणिती शिंदे यांच्या जामीनावर उद्या निर्णय 

सोलापूर : शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे व नगरसेवक चेतन नरोटे यांच्या जामीनावर बुधवारी (ता. 11) निर्णय होणार आहे. 

आमदार शिंदे आणि नगरसेवक नरोटे हे जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात स्वतःहून हजर झाले होते. त्यांना 4 सप्टेंबर रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. जामीन अर्जावर सोमवारी सरकारी पक्षाने म्हणणे दाखल केले. त्यावर दोन्ही पक्षातर्फे युक्‍तीवाद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास संपला असून आरोपींना पोलीस कोठडीची आवश्‍यकता नाही असा मुद्दा आरोपीच्या वकीलांनी मांडला. जामीन अर्जावर बुधवारी निकाल देण्यात येणार आहे. दोन्ही अर्जदारांना दिलेला अंतरीम जामीन वाढविण्यात आला. या खटल्यात आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सुर्यवंशी, ऍड. दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंह राजपुत यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision on MLA Praniti Shinde's bail tomorrow