सातारा जिल्ह्यात मंगळवारीही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

माण तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये मंगळवारी (ता.6) सुट्टी जाहीर करण्यास आली आहे.

सातारा, ता. 5 : हवामान खात्याने उद्या (मंगळवार, ता. 6) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाचा जोर अद्याप ही कायम आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी उद्या (मंगळवार) सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Declared holiday tomorrow for school in Satara