तीन पिढ्यांच्या साथीने सजला कलाविष्कार

Decorated with three-generation companion, three-piece companion
Decorated with three-generation companion, three-piece companion

कोल्हापूर : येथील टाऊन हॉलच्या हिरव्यागार कॅनव्हासवर आज तब्बल पंच्याहत्तरहून अधिक कलाकारांचा कलाविष्कार सजला. कलाकार आणि कलासक्त कोल्हापूरकरांच्या तीन पिढ्या यानिमित्ताने एकवटल्या. निमित्त होते, कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्‍वरंग विश्‍वनाथ नागेशकर स्मृतिसोहळ्यानिमित्त आयोजित "मैफल रंग-सुरांची' या उपक्रमाचे.

रंगबहार संस्थेने सलग 43 व्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन केले. दरम्यान, संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ चित्रकार (कै) श्‍यामकांत जाधव यांनी आयुष्याच्या कॅनव्हासवरून नुकतीच कायमची एक्‍झिट घेतली. त्यांना यंदाची मैफल समर्पित करण्यात आली. 

ज्येष्ठ कला शिक्षिका निर्मला कुलकर्णी यांना यंदाच्या मैफलीतर्फे डॉ. नलिनी भागवत यांच्या हस्ते रंगबहार जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. श्‍यामकांत जाधव लिखित "आबालाल रेहमान' या पुस्तकाचे कार्यक्रमात प्रकाशन झाले. यावेळी चाटे शिक्षण समूहाचे डॉ. भारत खराटे, उद्योजक व्ही. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अजय दळवी, विलास बकरे, राहूल रेपे, सागर बगाडे, मनोज दरेकर, संजीव संकपाळ, विजय टिपुगडे, इंद्रजीत नागेशकर, सुरेश मिरजकर, अशोक पालकर, रियाज शेख, विजयमाला पेंटर, विश्रांत पोवार, चंद्रकांत जोशी, जी. एस. माजगावकर, श्रीकांत डिग्रजकर, एम. आर. देशमुख, धनंजय जाधव, सुधीर पेटकर, सर्जेराव निगवेकर आदी प्रमुख उपस्थित होते. 

प्रसिध्द बासरीवादक प्रा. सचिन जगताप, तबलावादक प्रशांत देसाई आणि संतूरवादक सोहम जगताप यांच्या वादनाची मैफल रंगली. त्यानंतर चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाविष्काराला प्रारंभ झाला. शिल्पकार सुनील चौधरी, अजित चौधरी, मंदार लोहार, चित्रकार आकाश मोरे, मंगेश शिंदे, अनिल कसबेकर, दिगंबर पाटील, अभिजीत जाधव, पुष्कराज मेस्त्री, अनुराधा क्षीरसागर, सुनील कुंभकर्णे, सिध्दांत पिसाळ, शिवाजी बेकवाडकर, शुभम माने, अभिजीत कांबळे, वैभव पाटील, गणेश कोवारे, सुनील पंडित, विजय उपाध्ये, योगेश सुतार, विलास बकरे, सई कोळेकर, तुषार पोवार, बापू सौदत्ती, किशोर राठोड, गजेंद्र वाघमारे, मनीपद्म हर्षवर्धन, सत्यजीत निगवेकर, नेहल पोतदार, वेद वायचळ, अनंत भोगडे, संजय शेलार, रमेश बिडकर, समृध्दा पुरेकर, अशोक धर्माधिकारी, विवेक कवाळे, कविता बंकापुरे, विपुल हळदणकर, स्नेहल पाटील, सुरेश पोतदार, श्रध्दा पोम्बुर्लेकर, अक्षय जाधव, स्वरूपा भोसले, शैलेश राऊत, संदीप पोपरे, वैशाली पाटील, स्वयम बिडकर, नितीन गावडे, समाधान हेंदळकर, आरिफ तांबोळी आदींनी मैफलीत सहभाग नोंदवला. सुमारे चार तासांच्या या मैफलीत हजारो कलासक्त कोल्हापूरकरांची मांदियाळी अवतरली. 

आम्ही चालवू पुढे वारसा... 
मैफलीत बालचित्रकार व शिल्पकारही मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यांनी "आम्ही चालवू हा पुढे वारसा' असा संदेशच यानिमित्ताने दिला. तीन वर्षीय मुलांपासून ते ऐंशी वर्षीय ज्येष्ठ कलाकारही मैफलीत सहभागी झाले. यंदा संयोजकांनी सर्व इच्छुक कलाकारांना संधी दिल्याने मोठा प्रतिसाद मिळाला. 

स्मृतींना मिळाला उजाळा 
डॉ. नलिनी भागवत आणि निर्मला कुलकर्णी यांनी या उपक्रमाच्या स्मृतींना उजाळा दिला. अनेक दिग्गजांच्या कष्टातून हा उपक्रम सातत्याने पुढे सुरू राहिला असून नवीन पिढी आता मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे पाहून नक्कीच अभिमान वाटतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com