पंढरपूरमधील पूर ओसरल्याने नागरिकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

काल (बुधवार) रात्री दहा वाजेपर्यंत पंढरपूर येथे पाण्याची पातळी वाढत होती. त्यानंतर पाण्याची पातळी स्थिर झाली आणि मध्यरात्रीपासून पाणी हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली.

पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी कमी करण्यात आलेले असल्याने पंढरपूर शहरातील पाण्याची पातळी आज (गुरुवार) कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर आलेले पाणी पूर्णपणे ओसरले आहे.

काल (बुधवार) रात्री दहा वाजेपर्यंत पंढरपूर येथे पाण्याची पातळी वाढत होती. त्यानंतर पाण्याची पातळी स्थिर झाली आणि मध्यरात्रीपासून पाणी हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली.

काल रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील भजनदास चौक, घोंगडे गल्ली, सरकारी दवाखाना, गोविंदपुरा या भागांमध्ये पाणी आले होते. या भागातील पाणी आज कमी झाले आहे. प्रदक्षिणा रस्त्यावरील पाणी पूर्णपणे ओसरले होते.

तथापि, आज उजनी धरणातून दुपारी बारा वाजता 1 लाख 20 हजार आणि वीर धरणातून 62 हजार क्‍युसेक पाणी सोडले जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease of floods in Pandharpur provide relief to the citizens