महाराष्ट्रात कांद्यांची आवक मंदावली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मध्य प्रदेश व राजस्थानमधील जुना कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील कांद्याची मागणी घटली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठेवर झाल्याचे व्यापारी सांगतात. 
 

भिंगार : कर्नाटक व आंध्र प्रदेशातील नवीन कांदा बाजारात येऊ लागल्याने दक्षिणेतील राज्यांकडून होणारी कांद्याची मागणी कमी झाली आहे. शिवाय मध्य प्रदेश व राजस्थानमधील जुना कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील कांद्याची मागणी घटली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठेवर झाल्याचे व्यापारी सांगतात. 

राज्यातील कांद्याचे भाव स्थिर असले, तरी मागणी अभावी बाजारात आवक मंदावल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात अजून 60 टक्के कांदा शिल्लक आहे. पावसाअभावी आपल्याकडील कांदा लागवड थांबली असून, भावात फारसा परिणाम होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश व राजस्थान येथील कांद्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याच्या भावावर परिणाम होणार आहे. यापुढे इतर राज्यांतील कांद्याच्या मागणीवर भाव अवलंबून असतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

नगरच्या घाऊक बाजारात काल (सोमवारी) क्रमांक एक कांद्याला 1300 रुपये, क्रमांक दोनला 1000 ते 900, तर क्रमांक तीन कांद्याला 700 रुपये भाव मिळाला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Decrease in onion demand in Bhingar