फत्यापूर सुन्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

हुतात्मा दीपक घाडगे यांचे पार्थिव आज येणार
सातारा - जम्मू- काश्‍मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीत फत्यापूर (ता. सातारा) येथील जवान दीपक घाडगे हुतात्मा झाल्याने कालपासून गाव व परिसर सुन्न झाला आहे. दीपक यांचे पार्थिव उद्या (शनिवारी, ता. 11) दुपारी फत्यापूर येथे येणार असून, सायंकाळी साडेपाच वाजता पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार केले जातील.

पूंछ सेक्‍टरमध्ये गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पाकिस्तान सैन्याने सीमेचे उल्लंघन करत भारतीय चौकीवर गोळीबार केला. या हल्ल्यात दीपक घाडगे यांना वीरमरण आले. या घटनेची माहिती काल रात्री उशिरा समजताच फत्यापूर व परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.

आज सकाळपासून शोकाकूल वातावरणात गावकरी एकमेकांना धीर देत होते. गावातील रस्त्यांची साफसफाई करत अंत्यविधी करण्याची तयारी सुन्न मनाने सुरू होती. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी गावकऱ्यांसोबत अंत्यविधी कार्यक्रमाच्या संदर्भात नियोजन करत आहेत. या घटनेमुळे गावात व परिसरात दीपक यांच्या शौर्याची चर्चा चालू आहे. गावात व पंचक्रोशीत ठिकठिकाणी दीपक यांच्या "वीर जवान अमर रहे' असे श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले आहेत.

दरम्यान, उद्या दुपारी 12 वाजता पार्थिव पुणे येथे, तेथून दुपारी दोन वाजता सातारा येथे व साताऱ्यातून दुपारी तीन वाजता फत्यापूर येथे नेले जाईल. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय इंतमात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: deepak ghadage cremated