निवारा केंद्रातच मजूर महिला प्रसूत, तलाठीच बनले मामा

Delivery of woman to Nighos
Delivery of woman to Nighos

पारनेर ः निघोजमध्ये निवारा केंद्र आहे. लॉकडाउनमुळे जे मजूर अडकून पडले आहेत, त्यांना त्या निवारा दिला आहे. प्रशासन त्यांची काळजी घेत आहे. त्या केंद्र तब्बल चार महिला गरोदर आहेत. त्यातील एक काल काल रात्री प्रसूत झाली. तेथील कामगार तलाठी जातीने निवारा केंद्रातील लोकांची काळजी घेत आहेत. त्यामुळे तेच त्या महिलांचे बंधू म्हणून भूमिका पार पाडीत आहेत. कालही त्या महिलेच्या बाळंतपणानंतर मुलीला प्रथम त्यांच्याकडे सोपवण्यात आले.

वाशिम, हिंगोली व नांदेड परीसरातून निघोज परीसरात शेत मजूरीचे काम करण्यासाठी दरवर्षी अनेक  महिला व पुरूष येत असतात. शेतीची कामे संपली की ते परत आप आपल्या गावी जातात. मात्र या वर्षी कोरोना व्हायरसमुळे राज्यात व देशातही संचार बंदी लागू झाली आणि हे मजूर निघोज येथेच अडकले.

लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या गावी जाता आले नाही. प्रशासनाच्या वतीने त्यांना परत जाण्यावर बंधने घातली व त्या सर्व 103 महीला पुरूष व लहान मुले यांना  निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयाच्या निवारा केंद्रात दाखल केले. त्यातील एका  महिला काल (ता. 19 )  रात्री नऊ वाजून एक मिनिटांनी प्रसूत झाली. तिने  एका गोंडस मुलीला जन्म दिला.
या निवारा केंद्रात  51 पुरूष , 44 महिला व आठ छोटी मुले आहेत. त्या पैकी सहा महिला गरोदर आहेत. त्यातीलच एक महिला काल प्रसूत झाली. तिला मुलगी झाली त्यामुळे संपुर्ण निवारा केंद्रात आनंद व्यक्त करण्यात आला.

येथील  निवारा केंद्र 28 मार्च रोजी सुरू झाले आहे.  निवारा केंद्रास निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती व अनेक स्वयंसेवी  संस्था मदत करत आहेत. सकाळी चहा व  दोन वेळचे चांगले जेवण येथील कार्यकर्ते नियमित व वेळवर सोशल डिस्टंन्स पाळून देत आहेत. तसेच बहुतेक वेळा सकाळी नाष्टाही दिला जातो. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने येथील मजूरांचेची आरोग्य तपसाणीही वेळेवर केली जाते.

काल रूपाली यांना प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या नंतर त्यांना तात्काळ येथील निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेथ वैद्यकिय अधिकारी डॉ.स्मिता म्हस्के तसेच आरोग्य सेविका एम. एम. गायकवाड, एच.एल. गायकवाड व आर.आर. नागरे यांनी रूपालीची योग्य काळजी घेत प्रसूती केली.

माझ्या भरोशावर त्या इथे राहिल्या

ज्या वेळी आम्ही या मजूरांना त्यांच्या गावी जाण्यापासून रोखले होते त्यावेळी रूपाली आणि इतर गरोदर महिला आम्हाला विनंती करत होत्या. आम्ही सहा जणी गरोदर आहोत. आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या. म्हणजे बाळंतपणासाठी आमच्या माहेरी आईकडे जाता येईल, अशी विनंती केली. मात्र त्या वेळी मी  म्हणालो  येथे मी तुमची तुमच्या भावाप्रमाणे काळजी घेईल. कोणतीच आडचण येऊ देणार नाही. मी त्यांची शेवटपर्य़ंत काळजी घेतली व प्रसूती वेळीही मी आरोग्य केंद्रातच उपस्थीत होतो. प्रासूती होईपर्यंत मी  चिंतेत होतो. बाळाच्या रडण्याचा आवाज बाहेर आला अन मी सुटकेचा निश्वास सोडला. त्या नंतर  आरोग्य कर्मचा-यांनीही प्रथम बाळ बाहेर आणल्यावर माझ्याच हातावर ठेवले, त्या वेळी मला खूप आनंद झाला.

- विनायक निंबाळकर,कामगार तलाठी. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com