वजन वाढविण्याऱ्या मटण विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कोल्हापूर - बकरी कापल्यानंतर पाण्यात बुडवून वजन वाढविण्याऱ्या मटण विक्रेत्यांवर कारवाई व्हावी, 31 डिसेंबरच्या निमित्ताने शहरी तसेच ग्रामीण भागात मटणाचा प्रतिकीलो दर एकच ठेवावा यामागणीचे निवेदन जिल्हा सर्वपक्षीय कृतिसमितीच्या वतीने महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना देण्यात आले. 

शिष्टमंडळाने आज सकाळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांची भेट घेतली. कोल्हापूर जिल्हा हा मांसाहारी जेवण व तांबडा पांढरा रस्यासाठी प्रसिद्ध आहे. शहरात मटणाचा प्रतिकिलो दर 480 असा आहे. तर लगतच्या ग्रामीण भागात हाच दर 320 - 380 असा आहे. त्यामुळे शहरवासींयावर अन्याय होत आहे. बकऱ्याचे वजन वाढविण्यासाठी काही विक्रेत्यांकडून बकरी कापल्यानंतर ती पाण्यात बुडवूनतिचे वजन वाढविले जाते.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बकऱ्याची तपासणी न करता अशा प्रकारची विक्री करणे हे अंगवळणी पडले आहे. दरवर्षी श्रावण महिना तसेच 31 डिसेंबरला मटणाचे दर वाढवले जातात. शहर व जिल्हा एकच असताना हे दर वेगवेगळे का यावर कोणाचे नियंत्रण आहे असा सवाल शिष्टमंडळाने केला. जिल्ह्याच्या ख्यातीप्रमाणेयंत्रणांकडून कारवाई करून जनतेला भेसळ नसलेले, चांगले तसेच एकाच दरात मिळावे ही मागणी केली. 

यावेळी बाबा पार्टे, आर. के. पोवार, किशोर घाटगे, जयकुमारशिंदे, तानाजी पाटील, मनोहर सोरप, कुमार खोराटे, रणजीत काकडे, महादेव आयरेकर, किशोर घाटगे, शंकरराव शेळके, सुनिल खिरूगडे यांचा समावेश होता.  

Web Title: Demand for action on weight gainers Mutton sellers