भाजपची 'पाकीट' संस्कृती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

सांगली : पालिका निवडणुकीच्या तोंडावर व आचारसंहिता लागू असताना भाजपतर्फे भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. ही भाजपची 'पाकीट' संस्कृतीच आहे, असा आरोप सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पक्षाची मान्यताही रद्द करण्यात यावी, अशी मागणीही समितीतर्फे करण्यात आली. 

ऍड. शिंदे म्हणाले,''पालिका निवडणुकीत लोकांना भेटवस्तू वाटा असे आवाहन खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले होते. त्याची अंमलबजावणी तातडीने करत 'भाजप'तर्फे पाकिटे वाटण्याचे काम सांगलीत सुरू आहे. आचारसंहितेचा भंग करून अशी पाकिटे वाटली जात आहे. भारतीय दंड विधान संहिता तसेच रेप्रेसेंटशन ऑफ पीपल्स ऍक्‍ट नुसार हा गुन्हा आहे. पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच पाकीट वाटपाबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पाकीट वाटपाची घोषणा करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी.'' 

ते म्हणाले,''भाजपसह कॉंग्रेस व इतर पक्षांचे कार्यकर्ते पैठणी वाटप, सोने वाटप, लकी ड्रॉ, स्पर्धा घेत आहेत. मुळात अशा स्पर्धा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही परवानगी न घेता नागरिकांना भुलवण्याचे काम सुरू आहे.'' यावेळी गजानन गायकवाड, जयंत जाधव, ऍड. अरुणा शिंदे, तेजश्री अवघडे, अलका पाटील, तानाजी रुईकर, हर्षवर्धन आलासे, संतोष शिंदे, युवराज नायकवडे, महालिंग हेगडे, आसिफ मुजावर, सचिन चोपडे, शकील शेख, रमेश डफळापुरे उपस्थित होते.

Web Title: Demand to cancel BJPs registration in Sangli