मोहोळ : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वाणवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

मोहोळ - येथे जास्त संख्या ही हरीणांची आहे. वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी जंगलाच्या मध्यभागी एक सिमेंट टाकी आहे. मात्र वर्षानुवर्षे त्या टाकीत पाणी सोडले जात नाही.

मोहोळ : पापरी ता. मोहोळ येथील शासनाने लागवड केलेल्या जंगलातील वन्यप्राणी पाण्यामुळे सैरभैर झाले असून, त्यांना पिण्यासाठी तातडीने पाणी टाकीत सोडावे, अशी मागणी होत आहे.

पापरी ते देवडी मार्गावर पापरी व देवडी हद्दीत मोठी जंगले आहेत. या जंगलात वगळीच्या माध्यमातून दडण असल्याने या ठिकाणी हरीण, काळवीट, ससे, खोकड, लांडगे अशा वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात राहुटी आहे. जास्त संख्या ही हरीणांची आहे. वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी जंगलाच्या मध्यभागी एक सिमेंट टाकी आहे. मात्र वर्षानुवर्षे त्या टाकीत पाणी सोडले जात नाही. सध्या त्या टाकीत रिकामी पाण्याच्या बाटल्या व वाळलेला पाला आहे. या व्यतिरिक्त वन्यप्राण्यांना पाणी पाण्याची कुठेच सोय नाही. त्यामुळे हरणे नागरी वस्तीत येतात. परीणामी त्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज किंवा एक दिवसाआड तरी त्या टाकीत पाणी सोडावे. तरच वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

Web Title: The demand for drinking water for wild animals in mohol