कॅण्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक घेण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cantonment Board
कॅण्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक घेण्याची मागणी

कॅण्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक घेण्याची मागणी

बेळगाव - कॅण्टोन्मेंट बोर्डावर गेल्या दिड वर्षापासून प्रशासक व एका नामनिर्देश सदस्याची नेमणुक करण्यात आली आहे. मात्र, अध्यापही निवडणुकीसंबंधी कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. यामुळे इच्छुकांतून नाराजी दिसून येत आहे. संरक्षण मंत्रालयाने बोर्डाची निवडणूक घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

कॅण्टोन्मेंट बोर्डाचा लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाल २०१५ ते २०२० पर्यंत होता. मात्र, त्या काळात निवडणुक घेणे शक्य नसल्याचे कारण देत लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाल ६ आणि ६ महिन्यांसाठी म्हणजेच वर्षभरासाठी दोन वेळा वाढविण्यात आला. फेब्रुवारी २०२१ पर्यंत हा कालावधी वाढविला. फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत या ठिकाणी पूर्णपणे प्रशासकीय राजवट होती. मात्र, त्यानंतर एका नामनिर्देश सदस्याची नेमणुक करण्यात आली आहे.

बेळगाव कॅण्टोन्मेंट बोर्डाला १९० वर्षांचा इतिहास आहे. या हद्दीत २५ हजाराहून अधिक नागरीक वास्तव्यास आहेत. तसेच सुमारे १० हजार मतदार आहेत. एकूण सात प्रभाग आहेत. यापूर्वीही दोन वेळा लोकनियुक्त सदस्यांना वाढीव कालावधी देण्यात आला होता. गत सदस्यांनाही सहा वर्षांचा वाढीव कालावधी दिला. कॅण्टोन्मेंट हद्दीत लोकनियुक्त सदस्यांविना नागरीकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे लवकर निवडणुक घ्यावी, अशी मागणीही केली जात आहे.

कॅण्टोन्मेंट बोर्डाची मतदार यादी प्रत्येक वर्षी बनविली जाते. गतवर्षीही सप्टेंबरमध्ये ही यादी बनविली होती. यंदाही बनविली जाणार आहे. मात्र, निवडणुकीच्या कोणत्याही हालचाही नाहीत. बोर्डाची निवडणुक लढविण्यासाठी अनेक जण तयार आहेत. मात्र, हालचालीच नसल्याने त्यांचाही हिरमोड झाला आहे.

‘कॅण्टोन्मेंट बोर्डावर आम्ही सदस्य असताना पाच वर्षे पूर्ण केली. तसेच एक वर्ष वाढीव कालावधी दिला होता. सध्या एकच नामनिर्देश सदस्य आहे. निवडणुकीसंबंधी कोणत्याच हालचाली नाहीत.

- रिझवान बेपारी, माजी सदस्य, कॅण्टोन्मेंट बोर्ड.

Web Title: Demand For Election Of Cantonment Board

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top