पापरीला फळ खरेदीसाठी परदेशातून मागणी

राजकुमार शहा
बुधवार, 24 एप्रिल 2019

मोहोळ : कमी पाणी, कमी वेळ व जादा उत्पन्न घेण्याकडे पापरी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा कल वरचेवर वाढत असून पुणे सोलापूर मुंबई यासह आता परदेशातील व्यापारी माल खरेदीसाठी थेट पापरी येथे येऊ लागले आहेत. खरबूज, कलिंगड, द्राक्षे, केळी, डाळिंब या सारखी फळपिके ते खरेदी करीत आहेत. पापरी येथील शेतकरी समाधान भोसले यांनी खरबुजाच्या नवीन वाणाची लागवड करून, ते अरब देशात निर्यात केले आहे. त्यातून त्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

पापरी म्हणजे भाजीपाला व इतर फळपिकांचे उत्पादन घेण्यात जिल्ह्यात वरच्या क्रमांकावर आहे. टोमॅटो, काकडी, मिरची यासारखी पिकेही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. पूर्वी भाजीपाला व इतर पिके विक्रीसाठी बाजारपेठेत जावे लागे, मात्र व्यापाऱ्यांनी त्यांचा व शेतकऱ्यांचा फायदा बघून थेट पीक  क्षेत्रावर येऊन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. जुनी पारंपरिक शेती सोडून शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान अवगत करून, ठिबक सिंचना बरोबरच तुषार सिंचनाचा ही वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. द्राक्ष, केळी ,डाळिंब, बोर, पपई  या पिकांच्या उत्तम दर्जामुळे याला परदेशात मोठी मागणी वाढत आहे.

भोसले यांनी 55 दिवसात 34 टन  खरबुजाचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी यापूर्वी डाळिंब, केळी ही पिके युरोपमध्ये निर्यात केली आहेत. बाजारपेठेत द्राक्ष, खरबूज, कलिंगड ही पापरी ची फळपिके विक्रीस आल्याचे  समजताच, त्याची प्राधान्याने विक्री केली जाते . उत्तम दर्जा मुळे पापरीचा बाजारपेठेत दबदबा आहे.

शेती करणे वरचेवर अवघड होत आहे, असं जरी असलं तरी आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे व खर्चाचे सुयोग्य नियोजन केले तर, कमी कालावधीत चांगली  पिके घेता येतात. आता व्यापारी पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे, बाजारात कशाला मागणी आहे हे पाहून ते पिकविले पाहिजे. ज्या तरुणाकडे शेती आहे अशांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळावे.
- समाधान भोसले, शेतकरी पापर

Web Title: demand from foreign for Papri village