फळबागा जगविण्यासाठी 45 गावांना पॅकेज देण्याची मागणी

फळबागा जगविण्यासाठी 45 गावांना पॅकेज देण्याची मागणी

मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागातील 45 गावांना फळबागा जगविण्यासाठी पंचायत समितीचा ठराव करून पॅकेज देण्याबाबतची मागणी करणार असल्याचे सभापती प्रदीप खांडेकर यांनी सांगितले. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यातील 45 गावांची बैठक नंदेश्वर येथील हनुमान मंदिरात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी लक्ष्मी दहिवडीचे शिवानंद पाटील खडकी होबाप्पा शेंबडे, सुरेश ढोणे, खाजाभाई मनेरी, सुनिल पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास प्रा. शिवाजीराव काळुंगे, दौलतराव माने, शिवाजी चव्हाण, सरपंच प्रकाश इंगोले, विष्णू बंडगर,नाथा काशीद, धनाजी गडदे, शहाजन पटेल, अण्णा माळी, बापू शेळके, तानाजी चौगुले, अंकुश खताळ, भगवान चौगुले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृषी क्रांती क्लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे म्हणाले, शासनाने तीन महिन्यात कायम दुष्काळी 45 गावांना पुढील तीन महिन्यात कोरडवाहू गावाचा दर्जा दिला पाहिजे. नाहीतर 45 गावे स्वतःहून राज्यातून बाहेर पडतील असा इशारा देत गंभीर दुष्काळामुळे या वर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. नंदेश्वर येथील प्रगतशील शेतकरी गुरुलिंग दोलतडे यांनी नंदेश्वर परिसरात आत्ताच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, दहा पुढे दहा महिने कसे काढायचे हाच प्रश्‍न शेतकऱ्यांच्या पुढे आहे असे सांगितले. सलगर बुद्रुक येथील शेतकरी तानाजी जाधव यांनी  कायम दुष्काळी भागातील फळबागा वाचवण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा भविष्यात गावांच्या पट्ट्यात फळबागा राहणार नाहीत. शिवाजीराव नागणे यांनी दुष्काळी गावांना कायमस्वरूपी मदत करण्यासाठी जी उपाययोजना शासनाने करावी अशी मागणी केली पाठखळ शेतकरी बापूसाहेब मेटकरी यांनी कायमस्वरूपी दुष्काळी पावसावर अवलंबून असणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकत्रित करून शासनाला कायम दुष्काळी गावांना कोरडवाहू गावांचा दर्जा द्यावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दवले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com