नगर-दौंड रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराला खंडणीची मागणी 

संजय आ. काटे 
सोमवार, 16 जुलै 2018

श्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड मार्गे बेळगाव या रस्त्याचे काम करणाऱ्या दिनेशचंद्र आर. अग्रवाल या कंपनीच्या अधिकाऱ्यांना पन्नास हजाराची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार घडला. खंडणी देण्यास नकार दिल्यावर सदर अधिकाऱ्याला लाथाबुक्यांनी मारहाण झाली. ही घटना काल रविवारी निमगावखलु ता. श्रीगोंदे येथे घडली. आज श्रीगोंदे पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. 

अग्रवाल कंपनीचे उपप्रकल्प अधिकारी मनोहर यादव यांनी फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानूसार काष्टीपासून दौंड दिशेला निमगावखलू शिवारात पुलाच्या कामावर ते थांबले असता तेथे दौंडच्या दिशेने मोटारसायकल क्रमांक एम एच १२ पीपी ८५९४ यावरुन तीन जण आले. 

आलेले लोक म्हणाले, 'या कामाचा मुख्य ठेकेदार कोण आहे,' त्यावर यादव यांनी तेच असल्याचे सांगताच, 'आम्ही या भागातील दादा लोक आहोत. काम करायचे असेल तर दरमहा पन्नास हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील.' त्यावर यादव यांनी ते अधिकारी असून ठेकेदार दुसरे असल्याचे सांगत असे पैसे देण्यास नकार दिला. त्यावर त्या तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. काम करायचे असले तर पैसे द्यावे लागतील असे ते धमकावत होते. कंपनीच्या इतर लोकांनी हस्तक्षेप करीत मारहाण थांबविल्यानंतर ते तीघे निघून गेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरोधात खंडणी मागून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Demand for the ransom of the municipal-road contractor

टॅग्स