रत्नदीप बारबोले यांच्या चित्रांना अमेरिकेतून मागणी

किरण चव्हाण 
बुधवार, 18 जुलै 2018

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील दारफळ येथील चित्रकार रत्नदीप बारबोले यांच्या चित्रांना थेट अमेरिकेतून मागणी आली असून ग्रामीण भागातील चित्रकाराची कला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल्याने श्री. बारबोले यांचे सर्वत्र कैातुक होत आहे. 

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील दारफळ येथील चित्रकार रत्नदीप बारबोले यांच्या चित्रांना थेट अमेरिकेतून मागणी आली असून ग्रामीण भागातील चित्रकाराची कला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल्याने श्री. बारबोले यांचे सर्वत्र कैातुक होत आहे. 

माढा तालुक्यातील दारफळ (सिना) येथील चित्रकार रत्नदीप बारबोले यांनी आपले वात्सल्य हे पेंटींग इंटरनेटवर पोस्ट केले होते. अमेरिकेतील भारतीय वंशाचे रियल इस्टेट क्षेत्रातील उदयोजक एम. वायल यांना हे पेंटींग खूपच भावल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाची दोन पेंटींग श्री. बारबोले यांना रेखाटण्यास सांगितली. त्याप्रमाणे श्री. बारबोले यांनी कॅनव्हॅासवर वायल कुटुंबाची दोन चित्र काढली आहेत. ग्रामीण भागातील चित्रकाराच्या कलेची कदर थेट अमेरिकेतून झाली आहे. या अगोदरही श्री. बारबोले यांची चित्र इंग्लंड येथील प्रदर्शनातून विकली गेली आहेत. शिवाय नेदरलँड, रशिया, लंडन, दुबई या भागातून श्री. बारबोले यांच्या पेंटींगला या अगोदरच मागणी आली आहे. ग्रामीण भागातील कलाकाराची कला इंटरनेटमुले आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचून त्याच्या कलेच्या कदर होण्याबरोबरच कलाकाराला चांगले पैसैही मिळवून देत आहे. श्री. बारबोले यांची ग्रामीण भागातील कला सध्या सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहचली आहे. बारबोले यांच्या पेंटींगने थेट अमेरिका गाठल्याने त्यांनी याबाबत खुप आनंद होत असल्याचे सांगून आजपर्यंत आंतराष्ट्रीय पातळीवर अनेक पेंटींग विकली गेली पण आज थेट अमेरिकेत पेंटींग पोहचल्याने खूपच आंनद होत असल्याचे सांगितले.

Web Title: Demand of Ratnadeep Barbole paintings from America