नादुरूस्त रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे - छावा संघटना

हुकूम मुलाणी
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मंगळवेढा (सोलापूर) : अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने श्री संत दामाजी चौक ते शिवप्रेमी चौक या रस्त्यावर सध्या खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्याची गैरसोय होत असून सदर नादुरूस्त रस्त्याचे काम येत्या 7 दिवसात सुरु करावे अन्यथा नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. 

याबाबतचे निवेदन नगरपालिकेचे बांधकाम अभियंता तोडकरी यांना दिले असून यावेळी मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रज्वल शिंदे, युवक शहराध्यक्ष सूरज फुगारे, शहराध्यक्ष समाधान मुरडे, शहर संपर्कप्रमुख विशाल जावळे, निखिल रोकडे, सचिन मुरडे, अमित दत्तू, सागर मरिआईवाले, पप्पू जाधव आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. याबाबत दिलेले निवेदनात म्हटले आहे की,  संतनगरीतील प्रवेश करताना खड्डयातूनच प्रवेश करावा लागत आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रूपयाचा निधी मिळत असतानाही याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे.

Web Title: demand to repair the road by chhava sanghtna