मंगळवेढा बंद यशस्वी, आरोपींवर कडक कारवाईची मागणी

हुकूम मुलाणी
मंगळवार, 3 जुलै 2018

मंगळवेढा : धुळे जिह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे नाथपंथी डवरी समाजातील पाच जाणांच्या हत्येप्रकरणाचा निषेध करून  आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीयाच्या वतीने मंगळवेढा शहर १००% बंद केले होते. 

मंगळवेढा : धुळे जिह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे नाथपंथी डवरी समाजातील पाच जाणांच्या हत्येप्रकरणाचा निषेध करून  आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीयाच्या वतीने मंगळवेढा शहर १००% बंद केले होते. 

मारुती चे पटांगणात सर्वपक्षीय शोक सभा आयोजित केली होती. या वेळी आमदार भारत भालके, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राहुल शहा, मारुती वाकडे, लतीफ तांबोळी, अजित जगताप, नगराध्यक्ष अरुणा माळी, चंद्रकांत घुले, उपनगराध्यक्ष अनिता नागणे, शुभांगी सुर्यवंशी, भारत पाटील, नारायण गोवे, भारत बेदरे, भारत पवार, तानाजी खरात, प्रकाश वणगे, दिलीप जाधव, अविनाश शिंदे, रामभाऊ वाकडे, प्रविण खवतोडे, बशीर बागवान, रशीद तांबोळी, बिलाल बागवान, रावसाहेब फटे, अशोक माने, बाबा कोंडूभैरी, साहेबराव शिंदे, महादेव दिवटे आदी असंख्य नागरिक उपस्थित होते.

खवे येथे मृतदेह आणल्यावर नातेवाईकांनी आक्रोश केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी उत्तरानंतर खवेत तिघावर तर मानेवाडी येथे एकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये तात्काळ आर्थिक मदत आणि घरातील माणसाला शासकीय नोकरी देण्याचे लेखी पत्र लिहून दिले आहे.

आमदार भालके म्हणाले, सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या खटल्यासाठी वरिष्ठ वकील उज्वल निकम यांना नेमण्याचे ठरले आहे. या प्रकरणाचा कसून तपास करण्यासाठी एसआयटी नेमावी तेसच, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नाथपंथी  डवरी समाज हा राज्यात आणि राज्याबाहेर भिक्षा मागून जीवन जगत असतो आज राईनपाडा येथील 5 जणांची हत्या करून तेथील लोकांनी माणुसकीला काळिमा फासण्याचे काम केले आहे. मुले पळवणारी टोळी म्हणून मारहाण करून हत्या केली. आदिमानवाच्या काळातही अशा पध्दतीने मारहाण केली जात नसेल. आज 21 व्या शतकातील माणसे कशी वागतात हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. 
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, नगराध्यक्षा अरूणा माळी, अनिता नागणे, लतीफ तांबोळी, अविनाश शिंदे, नारायण गोवे, अॅड भारत पवार  यांनी मनोगतातून आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली. उपस्थितानी 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: The demand for strong action against the accused