दुध पावडर निर्यातीसाठी अनुदानची मागणी

राजकुमार थोरात
रविवार, 24 जून 2018

वालचंदनगर : आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये दुध पावडरचे दर सातत्याने कोसळत असून  दुध पावडर निर्यात करण्यास अडचणी येत अाहेत. शासनाने दुध पावडर निर्यातीला चालणा व शेतकऱ्यांना दुधाचा दर जास्तीजास्त देण्यासाठी दुध पावडरला प्रतिकिलोस ५० रुपये अनुदान देण्याची मागणी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामाध्यमातुन केंद्रसरकारकडे  केली अाहे.  गडकरी यांनी पाठपुरावा करुन सकारात्मक निर्णय करुन घेण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती माने यांनी दिली.

सोनाई परिवारचे अध्यक्ष दरशथ माने,कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व गोकुळ दुध संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक घाणेकर यांनी  केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली मध्ये तीन दिवसापूर्वी भेट घेतली. यासंदर्भात माने यांनी सांगितले की, जगभरामध्ये दुध पावडरचे दर कोसळले आहेत. तसेच लोणी व तुपावर १२ टक्के जीएसटी लागू आहे. पूर्वी हाच कर राज्यामध्ये पाच व परराज्यात विक्री केल्यास सात टक्के भरावा लागत होता. यामुळे तुपाच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. तसेच दुधापासुन बटर व पावडर निर्मिती होत असून दोन्हींचा अतिरिक्त साठा दुध संस्थेकडे झाल्याने व्याजाचा भुर्दंड प्रकल्पांना सहन करावा लागत आहे.याचा परिणाम दुध दरावरती होत असून शेतकऱ्यांना दुधाचा दर कमी द्यावा लागत आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रिोलिया, अमेरिका व इतर युरोपीय देशामध्ये दुध पावडरचे दर प्रतिटन २०५० डाॅलर आहेत. भारतीय पावडरीस १६५० प्रति टन दर मिळत असून १०७ रुपये प्रतिकिलो दर होत आहे.या दराने दुध पावडरची विक्री करणे परवडत नसल्याने शासनाने प्रतिकिलोस ५० रुपयेअनुदान देण्याची मागणी जिल्हातील दुध संस्थांनी गडकरी यांच्यामाध्यमातुन केंद्र शासनाकडे केली आहे. शासनाने अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना गाईच्या दुधास २३ रुपये प्रतिलिटर दर देणे शक्य असल्याचे माने यांनी सांगितले. या विषयाचा पाठपुरावा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री पियूष गोयल व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठवून सकारात्मक निणर्य घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिले असल्याचे माने यांनी सांगितले.

Web Title: Demand for subsidy for milk powder export