सिमोल्लंघन पांद चौकात भुयारी मार्गाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मोहोळ - मोहोळ शहरापासून जवळच असलेल्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिमोल्लंघन पांद चौकात भुयारी मार्ग व्हावा या मागणीचे निवेदनविजयसिह मोहीते पाटील यांना इंदीरा कन्या प्रशालेच्या विध्यार्थी प्रशालेचे मुख्याध्यापक सुधीर गायकवाड, संतोष गायकवाड यांनी दिले.

या चौका शेजारीच महाविद्यालये आहेत, शिक्षणासाठी परगाव हुन येणाऱ्या विध्यार्थ्यांची ही संख्या जास्त आहे. तर या ठिकाणाहुन सुमारे चार हजार विध्यार्थ्यांची ये जा असते, तर सोलापूर व पुण्याहुन येणाऱ्या वाहनांचीही संख्या जादा असुन ही वाहने भरधाव असतात त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढते आहे. या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेक विध्यार्थ्याना जीव गमवावा लागला आहे तर, अनेक नागरीकांना अंपगत्व आले आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा या साठी अनेक सामाजीक संस्था, राजकीय पक्षांनी वेगवेगळी अंदोलने केली, मात्र अश्वासनाशीवाय पदरात कांहीच पडले नाही.

विजयादशमी दिवशी याच चौकात मोठया धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन शहरवाशीयांनी केलेले असते. महामार्गाच्या पलीकडे मोठी रुग्णालये आहेत, तर ढोकबाभुळ गावाकडे जाणारा रस्ता याच चौकातुन जातो. त्यामुळे जीव मुठीत धरुनच या ठिकाणावरून जावे लागते, तर घरातुन बाहेर पडलेला माणुस घरी सुखरूप परत येईल याची खात्री नसते. या सर्व अडचणी दुर करण्यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे.

Web Title: Demand for the underground road in Simolehalganha Pand Square