संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!; ठाकरेंसमोर घोषणाबाजी

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!; ठाकरेंसमोर घोषणाबाजी

कोल्हापूर - ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. ६) अंबाबाई मंदिर परिसर दणाणून सोडला. निमित्त होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे. सीमाप्रश्‍नी लक्ष घालून केंद्र सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. ठाकरे यांच्याकडे केली.

लोकसभेतील विजयानंतर श्री. ठाकरे गुरुवारी कोल्हापुरात अंबाबाई दर्शनास आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सीमाभागातूनही कार्यकर्ते आले होते. दर्शनानंतर गरुड मंडपाबाहेर कार्यकर्त्यांनी श्री. ठाकरे यांची भेट घेतली. 
मंदिरातून ते बाहेर येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांना शांत करत श्री. ठाकरे यांनी स्वागत स्वीकारले. महाराष्ट्रातून शिवसेना व भाजपचे खासदार मोठ्या संख्येने संसदेत गेले आहेत. त्यांच्यामार्फत हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी विनंती श्री. ठाकरे यांच्याकडे केली.

शिष्टमंडळात माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, पंढरी परब, किरण गावडे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, विजय भोसले, मोहन भांदुर्गे, सुधा भातकांडे, दशरथ गावडे, किरण बडवाण्णाचे, मुरलीधर पाटील, जयराम देसाई, विवेक गिरी, प्रकाश चव्हाण, लक्ष्मण कसर्लेकर, यशवंत बिर्जे, विठ्ठल गुरव, विलास बेळगावकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com