शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

हुकूम मुलाणी 
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

मंगळवेढा : तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी मिळावे म्हणून काम बंद ठेवल्यानंतर ग्रामस्थांनी आता शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे व आराखड्यात समावेश करावा या मागणीचा जोर धरू लागली.

मंगळवेढा : तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी मिळावे म्हणून काम बंद ठेवल्यानंतर ग्रामस्थांनी आता शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे व आराखड्यात समावेश करावा या मागणीचा जोर धरू लागली.

म्हैसाळ योजनेच्या काम सुरू झाल्यापासून तालुक्यामध्ये या योजनेचे पाणी मिळणार म्हणून शेतकरी आशावादी होते. पण सहा हजार हेक्टरचे क्षेत्राचा समावेश आहे. नेहमीच्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ अतिशय भयानक असून मार्च महिन्यामध्ये बसणारे चटके यंदा ऑक्टोबरमध्येच बसू लागल्याने तालुक्यामध्ये म्हैसाळच्या अपुऱ्या कामामुळे तलावात पाणी सोडण्याची मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. परंतु या मागणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी या भागातील महिला व शेतकरी समवेत थेट तलावात ऐन हिवाळ्यात आंदोलन केले. पण पाणी सोडण्याचा दावा केलेल्या अधिकाऱ्यांनी अंतिम टप्प्यात म्हैसाळच्या आराखड्यामध्ये तलावात पाणी सोडण्याची तरतूद नसल्याचे सांगून हात वर केले.

सध्या निश्चित केलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी काम जोरात सुरू असून पूर्व भागातील सोडी, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खुर्द व बुद्रुक येथील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी हे काम बंद ठेवले. आता 308.66 द.ल.साठवण क्षमता असलेल्या शिरनांदगी तलावातील पाण्यावर अवलंबून असलेले शिरनांदगी चिक्कलगी रड्डे निंबोणी या गावातील जवळपास अकराशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. परंतु गेल्या काही वर्षापासून हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने या भागातील शेती अडचणीत आली आहे. म्हैसाळच्या पाण्याने तलाव भरून देण्यात तरतूद आराखड्यामध्ये करावा अशी मागणी होत आहे. तलावाची उंची आणि कालव्यांची कामे कमी निधीतून होवून ज्यादा क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते.

''दुष्काळी भागातील क्षेत्र ओलिताखाली येणाऱ्या या तलावाचा म्हैसाळच्या आराखड्यामध्ये समावेश करून भविष्यात पाणी देणे बाबत विचार करावा. अन्यथा या भागातील शेती आणि शेतकरी उध्वस्त होणार असून विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्येचे लोणी या भागात आले आहे.''
- नितीन पाटील, पक्षनेते.

''म्हैसाळ योजनेचे मंगळवेढ्याच्या हक्काचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्यात सोडण्यासाठी शेतकऱ्यांसोबत आंदोलन केले.शिवाय पाणी आसबेवाडी, सोडी, शिवणगी, सलगर, इत्यादी गावांना मिळण्यासाठी तसेच शिरनांदगी तलावात कायम पाणी सोडण्याची तरतूद व्हावी, म्हणून आ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन काळात मंत्रालयामध्ये मंत्री महोदय व अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.''
शैला गोडसे, आंदोलक

Web Title: Demands of the villagers to release water from the mhaisal lake in the Shiranandgi lake