डेमू रेल्वेतील गैरसोयींनी प्रवाशी हैराण

डेमू रेल्वेतील गैरसोयींनी प्रवाशी हैराण

सांगली -  कोल्हापूर - पुणे आणि मिरज - कुर्डुवाडी या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी डेमू रेल्वे सोडू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. सुरक्षिततेचा अभाव, पुरेशी बंदिस्त नसल्याने वयस्कर प्रवाशांना होणारा त्रास यासह अनेक गैरसोयींमुळे हैराण झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. 

सध्या मिरज विभागासाठी तीन डेमू दाखल झाल्या आहेत. कुर्डुवाडी, पुणे आणि कोल्हापूर मार्गांवर त्या धावतात. कराड ते कोल्हापूर दरम्यान पॅसेंजरला तुडूंब गर्दी असते; त्यासाठी आठ डब्यांची लोकल अपुरी ठरत आहे. जुन्या पॅसेंजर गाडीला बारा डबे असतानाही जयसिंगपूरनंतर अनेक प्रवाशांना दरवाजात लटकत प्रवास करावा लागत होता.

डेमू लोकलमुळे डब्यांची संख्या कमी झाली आहे; त्यामुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत. अपुरी आसनक्षमता, लगेज ठेवण्यासाठी अपुरी जागा यामुळेही त्रास सोसावा लागत आहे. तीनशेहून अधिक प्रवाशांनी गच्च भरणाऱ्या डब्यात एकच स्वच्छतागृह आहे. दुसऱ्या टोकाकडील प्रवाशाला तुडूंब गर्दीतून मार्ग काढत स्वच्छतागृहाकडे यावे लागते. अनेकदा गर्दीमुळे त्याचा वापर अशक्‍य ठरतो. तशी तक्रार कोल्हापूर स्थानकात तक्रार पुस्तकात प्रवाशांनी नोंदवली आहे. 

डब्यात वेगवेगळी कपांर्टमेन्ट नसल्याने कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांची गोची होते. खासगीपणा राहत नाही. मोठे सरकणारे दरवाजे उघडेच राहील्याने डब्यात जोरदार वारे घुसते; त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. डब्यात चढ-उतारासाठीही डेमू गैरसोयीची असल्याचे प्रवाशांनी सांगितले. कोल्हापूर, सांगली, बेळगाव इत्यादी कमी अंतराच्या प्रवासासाठी ती सोयीची असली तरी पुणे, कुर्डुवाडीसाठी गैरसोयीची असल्याचे तक्रारपुस्तिकेत नोंदवले आहे. 

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डेमू रेल्वे गैरसोयीची आणि असुरक्षित आहे. खिडकीशेजारी बसू इच्छिणाऱ्या प्रवाशासाठी सिंगल विण्डो सीट नाही. बसण्यासाठी जुन्या डब्यांप्रमाणे पुरेशी आसने नाहीत. लांब पल्ल्याच्या प्रवासात विश्रांतीसाठी आसनव्यवस्था सोयीची नाही. त्यामुळे डेमू जवळच्या प्रवासासाठीच वापरावी. 
- डॉ. बी. जे. हेतवडे,
प्रवासी, दुधेभावी ( ता कवठेमहांकाळ ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com