सांगरूळमध्ये डेंगी तापाची साथ 

sangurl-dengue
sangurl-dengue

सांगरूळ - येथे आठवड्याभरात तापाचे तब्बल २४ रुग्ण सापडले असून, तिघांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले आहे. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून डबकी व टायरची विल्हेवाट लावून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने केले आहे.

दोन महिन्यांपूर्वी टायरीत पाणी साठल्याने डेंगीचे डास व अळ्या सापडल्या होत्या. त्यावेळी दोन रुग्ण सापडले होते. त्यानंतर आता बाजारवाडा परिसरात तीन डेंगीचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी दोघे उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केल्यानंतर तापाचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्याभरात १५ रुग्ण असे २४ जण उपचार घेऊन गेले आहेत. काहीजण खासगी डॉक्‍टरांकडे उपचार घेत आहेत. यामुळे तापाचे आणखी रुग्ण असण्याची शक्‍यता आहे. या तापाचे व डेंगी डासाच्या नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गटारीवर पावडर फवारली असून, धूर फवारणी  सुरू आहे.

सांगरूळ ही मुख्य बाजारपेठ असल्याने सर्व व्यवसाय या ठिकाणी आहेत. अनेक ठिकाणी टायर रिकामे पडल्याने टायरीत पाणी साठल्याने डेंगीचा प्रसार होत आहे. आरोग्य विभागाकडून साचलेल्या डबक्‍यात तेल, ऑईल टाकणे, धूर फवारणी केली जात आहे. 

आरोग्य सहायक संजय कोटकर व दीपक माने यांच्या आरोग्य पथकाने गावात सर्वेक्षण केले असून, ठिकठिकाणी टायरची विल्हेवाट लावली जात आहे. 

आठवड्याभरात तापाच्या १५ रुग्णांनी उपचार घेतला आहे. सर्व्हेत पुन्हा तापाचे नऊ रुग्ण सापडले असून, तिघांना डेंगी झाला होता. दोघे बरे झाले आहेत. हा व्हायरल ताप आहे.
- डॉ. अश्विनी पाटील,  वैद्यकीय अधिकारी, सांगरूळ आरोग्य केंद्र.

ग्रामपंचायतीतर्फे पावडर टाकून, धूर फवारणी चालू आहे. आरोग्य विभागाला व नागरिकांना स्वच्छतेच्या व आरोग्याच्या सूचना दिल्या आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे तापाचे रुग्ण व डेंगीचे रुग्ण प्रशासनाला समजत नाहीत. तसेच टायरची विल्हेवाट न लावल्यास त्या टायर जप्त करण्यात येतील.
- सदाशिव खाडे, सरपंच, सांगरूळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com