डेंगींच्या अळ्यांचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - डेंगीच्या आजाराने शहर त्रस्त असताना दर दोनआड घरात डेंगीच्या अळ्यांचे साम्राज्य असल्याची माहिती महापालिकेच्या सर्व्हेत पुढे आली आहे. टेरेसवरील पाणी साचून राहिलेल्या कुंड्या, पाण्याचे बॅरेलमध्ये मोठ्या प्रमाणावर अळ्या आढळून येत आहेत.

दोन महिन्यांपासून पालिकेच्या वतीने घरोघरी सर्व्हे सुरू आहे. तब्बल एक हजार जणांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रोजच्या सर्व्हेतही किमान पंधरा डेंगीसदृश रुग्ण आढळून येत आहेत. डेंगीच्या अळ्यांचा जन्मच घरोघरी साचलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याचे पुढे येत आहे. या अळ्या जणू काही आपण आपल्याच घरीच पाळत आहे, अशी स्थिती आहे.

घर बांधण्यापूर्वी अनेकांना टेरेसचे वेड असते. काही महिने निघून गेल्यानंतर टेरेसवर कुणीही फिरकत नसल्याचे चित्र निर्माण होते. टेरेसवर कुंड्या आहेत, त्यात पाणी साचल्याने डेंगीच्या अळ्या आढळून येत आहेत. जुने टायर, पक्ष्यांसाठी पाण्याचे बाऊल यात अशाच प्रकारच्या अळ्या आढळून येत आहेत.

पाणी साठवून ठेवण्याची मानसिकता शहरवासीयांच्या अंगलट येऊ लागली आहे. नेमका स्वच्छ पाण्यातच डेंगीचा डास तयार होतो. कुणाच्या घरी अथवा कुंड्यातील पाण्यात डास झाला आहे, हा भाग महत्त्वाचा नाही, शेजारी असलेल्या कुटुंबीयांचाही हा डास चावा घेऊ शकतो.

दर दोन घरांमागे एका घरात अळ्या आढळून येत आहेत. जादा दिवसांचे पाणी असल्यामुळे अळ्यांचे साम्राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे. नर्सरीवर यंत्रणेचे विशिष्ट लक्ष आहे. मध्यतंरी एका नर्सरीतील शंभर कुंड्यांमध्ये अळ्या आढळल्या होत्या.

फ्रीजच्या कंडेनसरमध्ये अळ्या आढळून येत आहेत. शहराची लोकसंख्या सुमारे पावणेसहा लाखांच्या घरात आहे. दररोज येजा करणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. इतक्‍या मोठ्या संख्येसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा केवळ पाचशे ते सहाशेच्या घरात आहे. घरोघरी जाऊन प्रबोघन करणे इतकेच यंत्रणेच्या हाती राहिले आहे. पावसाची संततधार, ढगाळ हवामान यामुळे डेंगीचे संकट तीव्र होत चालले आहे. दोन महिन्यांतून पन्नास हजारांहून अधिक घरांचा सर्व्हे झाला आहे. त्यात बहुतांशी घरातच अळ्या आढळल्या आहेत.

आठ महिन्यांत १९०८ जणांना लागण
आठ महिन्यांत डेंगीची लागण झालेल्या रुग्णांच्या १९०८ च्या पुढे गेल्याचे मनपा आरोग्य विभागाने म्हटले आहे. हा आजार विषाणूजन्य डासांच्या चावण्याने होत असून, जगात औषध अथवा लस शोधण्यात शास्त्रज्ञांना अद्याप तरी यश आले नसल्याचे आरोग्याधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एडीस इजिप्ती डासामुळे डेंगीच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. निदान झाल्यानंतर प्लेटलेटचे प्रमाण नियमित राखणे अथवा शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगवेगळ्या सलाईनद्वारे अबाधित ठेवणे यास पर्याय नसल्याचे म्हटले आहे. बॅरेल कोरडी करून पाणी भरणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, रिकाम्या जागेत पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे, सायंकाळी दारे खिडक्‍या बंद करणे, अशी दक्षता आवश्‍यक आहे. भूक लागेल तेव्हा केव्हाही हा डास चावू शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Dengue Sickness Healthcare