सोलापुरात डेंगीसदृश्‍य आजाराचे रुग्ण वाढले 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सोलापूर - शहरात गेल्या महिनाभरात डेंगीसदृश्‍य आजाराचे जवळपास 125-130 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त असून, सातत्याने होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम असल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. 

सोलापूर - शहरात गेल्या महिनाभरात डेंगीसदृश्‍य आजाराचे जवळपास 125-130 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त असून, सातत्याने होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम असल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. 

शहर व परिसरात जूनमध्ये डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 27 रुग्ण आढळले. त्यापैकी सहा जणांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला होता. जानेवारी ते जून या कालावधीत डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 130 रुग्ण आढळले. उपचारानंतर हे रुग्ण बरे झाले आहेत. हिवताप विभागामार्फत शहराच्या विविध भागात एक लाख 98 हजार 549 ठिकाणच्या पाणी साठवलेल्या ठिकाणची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच हजार 432 कंटनेर, भांड्यांत लारव्हा (अळ्या) आढळल्या होत्या. 

गेल्या महिनाभरातच सव्वाशेच्या आसपास संशयित रुग्ण झाल्याने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शहर व हद्दवाढीच्या घरातील हौद, कुलरमधील पाणी, रिकामे टायर, गेल्या सात ते आठ दिवसांपासून साठविण्यात आलेले पाणी असे स्वरूप या घरांमध्ये होते. या घरमालकांना पाणी टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

डेंगीसदृश्‍य रुग्णांचे प्रमाण वाढल्याने शहराच्या विविध भागात फवारणी व धुरावणीचे नियोजन केले आहे. प्रत्येक झोननिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. 
- स्वाती इंगळे, जीवशास्त्रज्ञ 
महापालिका हिवताप विभाग 

Web Title: Dengue-like sight of sickness increased in Solapur